यंदा वेळेआधीच दाखल झालेला मान्सून सध्या गायब झाला आहे. मागच्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहे. मात्र आता विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरूवात झाली आहे.
जळगाव राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस झाला. यामुळे बळीराजापासून ते उकड्याने हैराण झालेले नागरिक आनंदी झाले आहेत. राज्यात आज कुठे-कुठे कसा पाऊस पडत आहे ते आपण जाणून घेणार आहोत….
मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील पूर्व उपनगरामध्ये गेल्या एका तासापासून तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. ठाणे, पुण्यातही पावसाने हजेरी लावली.
आज या जिल्ह्यांना अलर्ट
हवामान खात्यानं आज उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post