मुंबई । देशासह राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून दुसरीकडे अवकाळी पावसाचा सावट आले. शेतकरी रब्बी पिकांच्या काढण्यात व्यस्त असताना हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
देशातील हवामानात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे बदल पाहायला मिळत असून देशात पुढील 24 तासांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पाऊस 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने येण्याची पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात एकीकडे पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे तापमानात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
कुठे कोसळणार पाऊस :
सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अहमदनगर, बीड, छ. संभाजीनगर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Discussion about this post