पुणे । देशातील हवामानात सातत्याने बदल होत असून तापमानाचा पारा वाढल्याने थंडी गायब झाली आहे. अशातच शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे.पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २५ व २६ फेब्रुवारी या कालावधीत विदर्भातील अकोला आणि बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई तसेच पुण्यात कोरडं हवामान राहणार असून राज्यात कोकण वगळता काही भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय. दुसरीकडे राजधानी दिल्लीत हवामानात लक्षणीय बदल होणार असून ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याचवेळी उत्तर-पश्चिम भारतातील काही भागात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. IMD नुसार, २२ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीपर्यंत तब्बल १५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
उत्तर पंजाब, उत्तर हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, केरळ, झारखंडच्या काही भागासह ईशान्य राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Discussion about this post