मुंबई । महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असतानाच हवामान विभागाने वादळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचे सावट आहे.
पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे राज्यामध्ये पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असून हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या आठवड्यात राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळाली. अनेक शहरातील तापमान ४४ अंशापर्यंत गेल्याने असह्य करणारा उकाडा जाणवला. यामुळे नागरिक हैराण झाले. याच दरम्यान आता हवामान खात्यात राज्यातील काही ठिकाणी अवकाळीचा अंदाज वर्तविला आहे. शिवाय काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
कुठे कुठे अवकाळीचा इशारा –
पूर्व विदर्भात पुढील तीन दिवस अवकाली पावसाचा इशारा देणयात आला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे.
तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Discussion about this post