नवी दिल्ली । भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने २.५ कोटींपेक्षा जास्त आयडी निष्क्रिय केले आहेत. बनावट युजर्स ओळखल्यानंतर त्यांचे आयडी निष्क्रिय करण्यात आली असल्याची माहिती सरकारने दिली. भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग सिस्टीममधील दुरुपयोग रोखण्यासाठी निर्णय घेतला आहे
ही खाती निष्क्रिय करण्यापूर्वी तात्काळ तिकिटे बुक करण्यात अनेक समस्या येत होत्या. अनेकदा असे निदर्शनास आले आहे की, तत्काळ बुकिंग विंडो उघडल्यानंतर काही मिनिटांतच तिकिटे बुक केले जातात. कारण, एजंट बॉट्स वापरुन तिकिटे बुक करत असत.ज्यामुळे सामान्य नागरिक तिकिटे बुक करु शकत नव्हते. या बदलानंतर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सरकारने काय माहिती दिली?
सरकारने संसदेत सांगितले की, तिकीट बुकिंग सिस्टीममधील अनियमितता रोखण्यासाठी आयआरसीटीसीने अलीकडे २.५ कोटींहून युजर आयडी निष्क्रिय करण्यात आले आहेत. हे युजर आयडी संशयास्पद आढळले होते. सरकारने सांगितले की, भारतीय रेल्वेने कन्फर्म तिकीट बुकिंग आणि डिजिट तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी काही बदल केले आहेत.
रेल्वेचे हे नियम बदलले
आरक्षित तिकिटे ऑनलाइन किंवा संगणीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली काउंटरवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come First Service) तत्वावर बुक करता येतात.
एकूण तिकिटांपैकी ८९ टक्के ऑनलाइन बुक केली जात आहे.
पीआरएस काउंटवर डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
१ जुलै २०२५ पासून ही तिकिटे IRCTC वेबसाइट आणि अॅपद्वारे फक्त आधार पडताळणी केलेल्या युजर्ससाठी बुक केले जाऊ शकतात.
तात्काळ आरक्षण सुरु झाल्यानंतर ३० मिनिटांत एजंटना तात्काळ तिकीटे बुक करण्यास मनाई आहे.
Discussion about this post