जळगाव । दिवाळी आणि छठपूजेदरम्यान प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने वांद्रे-बरौनी आणि उधना-भागलपूर या दोन अनारक्षित महोत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीमुळे जळगाव, भुसावळसह खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रेल्वे १५ तारखेपासून धावण्यास सुरुवात झाली आहे.
रेल्वे क्रमांक ०९०७९ वांद्रे टर्मिनस-बरौनी अनारक्षित स्पेशल ही ट्रेन दररोज वांद्रे टर्मिनस येथून रात्री ८.३० वाजता निघेल आणि तिसऱ्या दिवशी १२.१५ वाजता बरौनी येथे पोहोचेल. ही रेल्वे १५ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबरपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, रेल्वे क्रमांक ०९०८० बरौनी-वांद्रे टर्मिनस अनारक्षित स्पेशल ही रेल्वे दररोज दुपारी ३.०५ वाजता बरौनी येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. ही रेल्वे १७ ते २९ ऑक्टोबरपर्यंत धावेल.
उधना-भागलपुर विशेष रेल्वेच्या २८ फेऱ्या
रेल्वे क्रमांक ०९०८१ उधना -भागलपूर अनारक्षित विशेष रेल्वे दररोज उधना येथून सकाळी ११.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता भागलपूरला पोहोचेल. ही गाडी १४ ते २७ऑक्टोबरपर्यंत धावेल. ०९०८२ भागलपूर-उधना अनारक्षित विशेष ट्रेन भागलपूर येथून दररोज रात्री १०.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता उधना येथे पोहोचेल. ही रेल्वे १५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान धावेल. या दोन्ही रेल्वेंना नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, भुसावळ, खंडवा आदी ठिकाणी थांबा दिला आहे.















Discussion about this post