नवी दिल्ली । रेल्वे बोर्डाने निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त करण्याच्या नियमात बदल केले आहेत. जे कर्मचारी निवृत्त होतील त्यांना पुन्हा एकदा रेल्वेमध्येच नोकरी दिली जाईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलीय. वेतन स्तर १ ते ९ पर्यंतचे रिक्त पदे भरण्यात येतील. या विभागातील जे कर्मचारी तिसऱ्या रॅकिंगवरून निवृत्त झालेत, त्यांना पुन्हा नियुक्त केलं जाईल.
रेल्वेने स्पष्ट केले आहे की, आधी ज्या रॅकिंगचे कर्मचारी निवृत्त झालेत, त्याच विभागातील निवृत्त कर्मचाऱ्याना प्राधान्य देत त्यांनी नोकरीवर घेतलं जाईल. जर असे लोक उपलब्ध नसतील तर फक्त उच्च स्तरावरून निवृत्त झालेले कर्मचारीच पुन्हा नियुक्त केले जातील, असं रेल्वेनं स्पष्ट केलंय.
यासह, आता निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त करण्याचा अधिकार विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांना देण्यात आलाय. जर मुख्यालयात ही रिक्त जागा भरायच्या असतील तर त्याचा निर्णय महाव्यवस्थापक (GM) घेतील. तेच भरती प्रक्रियेचा निर्णय घेतील,पुन्हा किती पदे भरायची आहेत, याचा निर्णयही त्यांच्याकडे असणार आहे.
रेल्वे बोर्डाने असेही म्हटलं की, पुनर्नियुक्ती केवळ गरज पडल्यास आणि काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच केली पाहिजे. हा नवीन नियम या आदेशाच्या तारखेपासून लागू झालाय. त्याला रेल्वे बोर्ड आणि वित्त विभागाकडून मान्यता मिळालीय. या नियुक्त्या तेव्हाच केल्या जातील जेव्हा याची गरज असेल. पूर्ण विचार आणि माहिती घेऊनच निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त केलं जाईल.
तिकीट कन्फर्म होण्याची गॅरंटी वाढली
भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकींगची मर्यादा निश्चित केली जाणार आहे. एकूण तिकीटांच्या केवळ २५ टक्के तिकीटांना वेंटीगसाठी ठेवले जाईल. त्यामुळे आता तिकीट कन्फर्म होणार की नाही प्रवास करायचा की नाही या अनिश्चितेतून प्रवाशांची सुटका होणार आहे. रेल्वेच्या नव्या नियमानुसार AC फर्स्ट क्लास, सेकेंड आणि थर्ड, स्लीपर आणि चेअर कार- अशा प्रत्येक श्रेणीत एकूण सीटच्या कमाल २५ टक्के हिस्सा वेटिंग तिकीटाच्या स्वरुपात बुक केला जाईल.
रेल्वे बोर्डाने सर्व झोनल रेल्वे विभागांना हे परिपत्रक पाठवून नवा नियम लागू करण्याचे आदेश दिलेत. प्रत्येक झोन त्यांच्या क्षेत्रातील बुकींग आणि कॅन्सलेशनच्या ट्रेंडच्या आधारे हे निश्चित केलं जाईल. ट्रेनमध्ये किती तिकीटे वेटिंगची द्यायची हे झोनल रेल्वे ठरवेल. हा नियम लवचिक असणार आहे, परंतु २५ टक्क्यांच्यावर वेटिंगची तिकीटे दिली जाणार नाहीत.
Discussion about this post