तुम्हीही रेल्वेत नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. रेल्वे भरती मंडळाने रेल्वे तिकीट तपासणीस पदांसाठी ही अर्ज मागवली आहेत. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये.दहावी पास आणि बारावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.
उमेदवार कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आरामात अर्ज करू शकतात. फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करावी लागतील.
ही भरती भारतीय रेल्वेमध्ये टिसी पदासाठी आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 11255 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी 18 आणि 38 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा देखील द्यावी लागेल.
रेल्वेच्या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावी लागतील. तिथेच तुम्हाला भरती प्रक्रियेची इतरही माहिती आरामात मिळेल. संगणक आधारित चाचणी, वैद्यकीय तपासणी, लेखी परीक्षा, मुलाखत, शारीरिक कार्यक्षमता चाचणीनंतर उमेदवारीच निवड केली जाईल.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फीस ही भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना 250 फीस भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट केंद्र शासनाची नोकरी.
Discussion about this post