मध्य प्रदेशच्या भोपाळ रेल्वे स्थानकावर धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३१ मार्चच्या रात्री प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर घडलेल्या या घटनेचा १४ सेकंदांचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Enter a X URL
📍Bhopal, Madhya Pradesh: On March 31 at Bhopal railway station, a guy slipped while trying to catch the Bhopal–Indore Express and fell into the gap between the train and platform, getting dragged multiple times within seconds. He was critically injured and admitted to Hamidia… pic.twitter.com/2LosNt41Dy
— Deadly Kalesh (@Deadlykalesh) April 3, 2026
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ट्रेन प्लॅटफॉर्मवरून सुटत असताना एक तरुण धावत जाऊन ती पकडण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचा हात सटकताच तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध अडकून खाली पडतो. काही सेकंद तो ट्रेनसोबत फरफटत जात असल्याने घटनास्थळी उपस्थित प्रवाशांचा थरकाप उडाला.
या भीषण अपघातात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचा एक हात तुटला आहे, तसेच डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. तात्काळ रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी मदत करत त्या तरुणाला बाहेर काढून भोपाळमधील हमीदिया रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून धावत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे किती जीवघेणे ठरू शकते, याची जाणीव या अपघातातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.















Discussion about this post