तुम्हीही रेल्वेत नोकरी शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी पात्रता फक्त १०वी पास आहे.
तुम्ही रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.तुम्हाला secr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.जर तुम्ही फ्रेशर्स आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी तुमच्यासाठी. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. रेल्वेत एकूण १००७ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मे २०१५ निश्चित करण्यात आली आहे.
रेल्वेतील या नोकरीसाठी नागपुर डिवीजनसाठी ९१९ पदे रिक्त आहेत. वर्कशॉप मोतीबागमध्ये ८८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास केलेला असावा. याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. १०वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्ही SECR च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन चेक करा.
Discussion about this post