रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. उत्तर रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेलने शिकाऊ पदांच्या ३०३९ जागांसाठी भरतीची जाहिरात जारी केली आहे.या नोकरीसाठी ११ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. तर अर्जाची अंतिम तारीख १ जानेवारी २०२४ आहे.
यासाठी पात्रता किती आणि निवड कशी केली जाईल तसेच वयोमर्यादा आहे हे जाणून घ्या.
भरतीसाठी आवश्यक पात्रता
अर्ज (Application) करणाऱ्या उमेदवाराला मान्यता प्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेलं असावं. एनसीव्हीटीने जारी केलेल्या जाहीरातीत आयटीआय उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
वयश्रेणी
उमेदवाराचे वय हे १५ ते २४ वर्ष दरम्यान असावे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवरांना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
3. अर्ज कसा कराल?
रेल्वे rrcnr.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Apprentice Online Application लिंकवर क्लिक करा.
कागदपत्रे आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
4. अर्ज फी
सामान्य आणि ओबीसी श्रेणीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. तर SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
Discussion about this post