सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी बंपर भरती जारी केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे. या भरतीची माहिती एम्प्लॉयमेंट न्यूज पेपरमध्ये (19 ते 26 जानेवारी 2024) देण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २० जानेवारी २०२४ पासून सुरु होईल. अर्जाची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत असणार आहे. अर्ज (Application) कसा करायचा? वयोमर्यादा किती? जाणून घेऊया
कोणत्या पदासाठी जागा रिक्त
या मोहिमेद्वारे असिस्टंट लोको पायलटच्या एकूण ५,९६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
अर्ज कोण करु शकेल?
उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून ITI डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. तसेच उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष तर कमाल ३० वर्ष असायला हवे. राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सवलत देण्यात येईल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने अधिकृत सूचना वाचणे गरजेचे आहे.
अर्जाची फी : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IndianRailways.gov.in अधिकृत साइटला भेट द्यावी.
अधिक माहितीसाठी अधिकृत साइटला भेट द्यावी लागेल.
Discussion about this post