रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण पूर्व रेल्वेत भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.
अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. रेल्वेतील या नोकरीसाठी तुम्ही rrrcser.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. साउथ ईस्टर्न रेल्वे अप्रेंटिस भरती २०२४ साठी १७८५ पदे भरती केली जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२४ आहे.
पात्रता काय?
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून १० आणि १२वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत NCVT/SCVT द्वारे देण्यात आलेले ITI प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
या अप्रेंटिस पदासाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांनी निवड कोणत्याही परिक्षेशिवाय होणार आहे. मेरिट लिस्टद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. १०वी आणि बारावीत मिळालेल्या अंकाच्याआधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर महिला आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही.
माझगाव डॉकमध्ये नोकरी
सध्या माझगाव डॉकमध्येही नोकरीची सुवर्णसंधी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. तुम्ही माझगाव डॉकच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अधिसूचना वाचावी आणि अर्ज करावेत.
Discussion about this post