रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. रेल्वेकडून ३ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ॲप्रेंटिस पदांवर ही भरती होणार असून आरआरसीच्या या रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु आहे. ॲप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२४ निश्चित करण्यात आली आहे.
पदे किती आहेत?
रेल्वे भरती सेल- पश्चिम मध्य रेल्वेकडून ३३१७ ॲप्रेंटिस पदांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. सर्व डिटेल्स आणि अपडेटसाठी तुम्ही आरआरसी डब्ल्यूसीआरच्या ऑफिशियल वेबसाइटवर उपलब्ध भरती नोटिफिकेशन पाहू शकता.
पात्रता काय आहे?
ॲप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह १०वी पास असणे आवश्यक आहे. तसेच मेडिकल लॅब टेक्नीशियन पदांसाठी अर्ज करणाऱ्यांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास असणे गरजेचे आहे.
वयाची मर्यादा
अर्जदारांचे वय ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत १५ वर्षांहून कमी आणि २४ वर्षांहून जास्त असू नये. मात्र आरआरसी डब्ल्यूसीआर नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.
अशी होणार निवड
अपरेंटिस पदासाठी उमेदवारांची निवड १०वीची परीत्रा (किंवा समकक्ष) आणि आयटीआय/ट्रेडमध्ये मिळालेले गुणांच्या आधारे तयार केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारावर केली जाईल.
या पदांच्या अर्जासाठी शुल्क जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या उमेदवारांना १४१ रुपये. एससी, एसटी, पीएच आणि महिला उमेदवारांना ४१ रुपये आहे.
आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट आकाराचा लेटेस्ट फोटो
१०वीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट
१२वीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट (मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी)
आयटीआय सर्टिफिकेट आणि मार्कशीट (एनसीव्हीटी/ एससीव्हीटीकडून जारी केलेले)















Discussion about this post