भारतीय रेल्वे कडून असिस्टंट लोको पायलट पदांसाठी तब्बल ११,१२७ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. या नोकरीसाठी शॉर्ट नोटिफिकेशन जारी केले आहे.
रेल्वेतील असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्जप्रक्रिया १५ मेपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२६ आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी rrbapply.gov.in वर जाऊन अर्ज करावे.
असिस्टंट लोको पायलट पदासाठी पात्रता
रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. आयटीआय पास झालेले असावे. याचसोबत इंजिनियरिंगचा डिप्लोमा केलेला असावा. ज्यांनी इंजिनियरिंग केले आहे त्यांनीच अर्ज करावेत. या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
असिस्टंट लोको पायलट पदासाठी उमेदवारांची निवड सीबीटी टेस्ट १, सीबीटी टेस्ट २ आणि कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाणार आहे. यानंतर मेडिकल टेस्ट होणार आहे.या नोकरीसाठी निवड झाल्यावर सुरुवातीला १९,९०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील दिले जाणार आहेत.रेल्वेतील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. काही दिवसात तुमच्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु होईल. त्यानंतर इच्छुकांनी अर्ज करावेत.















Discussion about this post