जर तुम्ही रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे लवकरच एक मोठी भरती जाहीर करणार आहे.
रेल्वे भरती मंडळांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ९,००० हून अधिक नियुक्ती पत्रे जारी केली आहेत आणि २०२५-२६ दरम्यान ५०,००० हून अधिक उमेदवारांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. रेल्वे मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. एका प्रेस नोटमध्ये, मंत्रालयाने सांगितले की, “रेल्वे भरती मंडळांनी नोव्हेंबर २०२४ पासून ५५,१९७ रिक्त पदांच्या सात वेगवेगळ्या अधिसूचनेसाठी देशभरातून सुमारे १.८६ कोटी उमेदवारांनी या परीक्षांमध्ये भाग घेतला आहे.
रेल्वे भरतीचा रोडमॅप तयार
रेल्वे भरती मंडळाने गेल्या काही महिन्यांत भरती प्रक्रिया वेगाने पुढे नेली आहे. मंत्रालयाच्या मते, नोव्हेंबर २०२४ पासून आतापर्यंत ७ वेगवेगळ्या भरती सूचनांअंतर्गत ५५१९७ रिक्त पदांसाठी संगणक आधारित चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशभरातून सुमारे १.८६ कोटी उमेदवारांनी या परीक्षांमध्ये भाग घेतला आहे. या भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, २०२५-२६ या वर्षात ५०००० हून अधिक पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
एकूण भरती प्रक्रियेची माहिती देताना, मंत्रालयाने सांगितले की, आरआरबीने २०२४ पासून १,०८,३२४ रिक्त पदांसाठी १२ अधिसूचना जारी केल्या आहेत, जे पूर्वी जाहीर केलेल्या वार्षिक कॅलेंडरनुसार आहे. शिवाय, २०२६-२७ या आर्थिक वर्षात ५०,००० हून अधिक अतिरिक्त नियुक्त्या अपेक्षित आहेत. त्यात पुढे असेही म्हटले आहे की, “इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे फसवणूक होण्याची शक्यता कमी करण्यासाठी आरआरबीच्या सर्व परीक्षा केंद्रांवर आता १००% जॅमर तैनात केले जात आहेत.”रेल्वेने असेही सांगितले की या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ९,००० हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. म्हणजेच, रेल्वे हळूहळू त्यांच्या सर्व रिक्त पदे भरण्याच्या दिशेने काम करत आहे.
Discussion about this post