पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. एका मालवाहतूक ट्रेनने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिली. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत असे की आगरतळा ते सियालदहला जाणारी ट्रेन क्रमांक 13174 कंचनजंगा एक्स्प्रेसला मागून मालगाडीने धडक दिल्यामुळे अपघात झाला. ही घटना आज सोमवारी सकाळी नऊ वाजता घडली. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघातासंदर्भात कटिहार डीआरएमने सांगितले की, अपघाताच्या कारणांची तपासणी केली जात आहे. कटिहार आणि न्यू जलपाईगुडी (NJP) येथून बचाव पथके अपघातस्थळी रवाना करण्यात आली आहेत. जखमींच्या मदतीसाठी वैद्यकीय पथकेही रवाना आहेत. अपघातस्थळी पाऊस सुरु असल्यामुळे मदत आणि बचाव कार्यासाठी अडथळे येत आहेत.
Discussion about this post