सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष बाब म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.
रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदांसाठी सुरू आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. तब्बल 9739 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.
कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरची 9739 पदे भरली जातील. रेल्वे विभागात कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर होण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. कॉन्स्टेबल पदासाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. दहावी पास असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावीत.
या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला रेल्वेच्या साईटवर आरामात मिळेल. विशेष म्हणजे कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. आॅनलाईन पद्धतीनेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. अर्ज करताना हे लक्षात ठेवा की, आपण नेमक्या कोणत्या पदासाठी अर्ज हा करत आहोत.
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे विभागामध्ये बंपर भरती प्रक्रिया या सुरू आहेत. केंद्रिय रेल्वे मंत्र्यांनी नुकताच भरती प्रक्रियेची घोषणा केली. अनेक युवकांचे स्वप्न रेल्वे विभागात नोकरी करण्याचे असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचे देखील स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
Discussion about this post