तुम्हीही भारतीय रेल्वेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. रेल्वेने हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक उमेदवार आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
असिस्टेंट लोको पायलट (ALP) पदांसाठी ही भरती होणार असून तब्बल 9,900 जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) स्पष्ट केले आहे की अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. ऑफलाइन किंवा इतर कोणत्याही पद्धतीने पाठवलेले फॉर्म नाकारले जातील. अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत सूचना नक्कीच वाचा जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही.
शैक्षणिक योग्यता आणि वयाची अट
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेबद्दल सांगायंच झालं तर, 10 ते 30 वयोगटातील उमेदवार या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. एससी/एसटी/ओबीसी सारख्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल. वयाची गणना 1 जुलै 2025 आधारावर केली जाईल.
अर्ज शुल्क
जनरल / OBC/ EWS प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 500 रुपये शुल्क आहे. तर एसटी, PwBD/Ex-Servicemen उमेदवारांसाठी फक्त 250 रुपये शल्क आहे. शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
निवड प्रक्रिया
निवडीसाठी उमेदवारांना तीन टप्प्यांतून जावे लागेल. त्यात CBT-1 (प्रिलिम्स), CBT-2 (मेन्स) आणि CBAT (अॅप्टिट्यूड टेस्ट) यांचा समावेश आहे. यामध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर नोकरी दिली जाईल.
कसा दाखल कराल अर्ज?
अर्ज दाखल करण्याआधी RRB या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर ALP भरती 2025 लिंकवर क्लिक करा. सर्वात आधी रजिस्ट्रेशन करा त्यानंतर लॉगिन फॉर्म भरा. त्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करा. अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा. सबमिट झालेल्या फॉर्मची प्रिंट आऊट स्वतःकडे सुरक्षित ठेवा.
Discussion about this post