गुवाहाटी । एकीकडे अयोध्या नगरीमध्ये राममंदिर उद्घाटनाचा उत्साह असतानाच आसाममध्ये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मोठा गोंधळ झाल्याची बातमी समोर आली आहे.
आज (२२, जानेवारी) राहुल गांधी आसाममधील नागावमधील वैष्णव विद्वान श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी प्रार्थना करणार होते. मात्र त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले. ज्यानंतर राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी मंदिरासमोर आंदोलन सुरू केले. तसेच हे सर्व आसाम सरकारच्या दबावामुळे होत असल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला आहे.
राहुल गांधी मंदिर प्रवेशावर ठाम
‘मी का जाऊ शकत नाही? मी काय चूक केली आहे? मला फक्त जाऊन हात जोडायचे आहेत, आदर द्यायचा आहे. मी जाऊ शकत नाही, असे प्रशासन सांगत आहे, मग मी का जाऊ शकत नाही? अशी विचारणा राहुल यांनी केली.
Discussion about this post