विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लखनौ न्यायालयाने त्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावला. तीन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले होते. त्या विरोधात रुपेंद्र पांडे यांनी लखनौ येथील कोर्टात राहुल यांच्या विरोधात याचिका केली होती. त्याच्या सुनावणी दरम्यान राहुल गांधी वारंवार गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावला.
तसेच पुढील सुनावणी 14 एप्रिलला होणार आहे त्यावेळी राहुल गांधी हे उपस्थित राहिले नाही तर त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे.
राहुल गांधी यांनी 17 डिसेंबर 2022 मध्ये अकोला येथे पत्रकार परिषदेमध्ये सावकर यांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतले. ते इंग्रजांचे नोकर होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर सात्यकी सावकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात पुणे पोलिसांत तक्रार दिली होती. तर, रुपेंद्र पांडे यांनी लखनौमध्ये तक्रार केली होती.
पुणे न्यायालयाकडून दिलासा
सावकरांच्या बद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल पुणे न्यायालयात सुरू असलेल्या केसमध्ये कायमस्वरुपी गैरहजर राहण्यासंदर्भात सूट मिळण्याची अर्ज राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला होता. त्यांचा तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. राहुल गांधी याना सुट देण्याबाबात सात्यकी सावकर यांनी विरोध केला आहे.
Discussion about this post