रायबरेली । उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली लोकसभेच्या उमेदवारांबाबतचे सस्पेंस आज, शुक्रवारी काँग्रेसने संपले. अमेठीतून काँग्रेसने केएल शर्मा यांना तिकीट दिले आहे. तर राहुल गांधी स्वतः काँग्रेसची पारंपरिक जागा रायबरेली येथून निवडणूक लढवणार आहेत.
राहुल गांधी यांनी आज दुपारी 2 वाजता रायबरेलीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल गांधींच्या नामांकनावेळी सोनिया गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते.















Discussion about this post