मुंबई । स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदमानीकारण विधान केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आलेत.
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. सात्यकी सावरकर यांनी एप्रिल २०२३ मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत मानहानीचा खटला दाखल केला होता आणि शहर न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणात न्यायालयात हजर होण्याबाबत गांधी यांना बजावलेले समन्स चुकीच्या न्यायालयात गेल्याने परत आले होते. आता न्यायालयात हजर होण्याबाबत बजावलेले समन्स अखेर राहुल गांधींच्या घरी पोचलं असून ते त्यांनी स्वीकारलंय. आधी चुकीच्या न्यायालयात गेलेले समन्स दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात गेले आहे.
परंतु राहुल गांधी यांचे निवासस्थान तीस हजारी न्यायालयाच्या हद्दीत असल्याने समन्स बजावण्यासाठी कार्यवाही त्यांच्याकडून करण्यात केली जाणार होती.अखेर नव्याने पाठवलेले समन्स गांधी यांची घरी पोचले असून ते त्यांनी स्वीकारले देखील आहे. गांधी यांच्यावर दाखल असलेल्या दाव्याची सुनावणी आजी-माजी खासदार-आमदारांविरोधात खटले चालविणाऱ्या विशेष न्यायालयात होत आहे. त्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना हाजीर होण्याचे समन्स बजावले आहे. या प्रकरणी सुनावणी होणार आहे.















Discussion about this post