मुंबई । काही दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ८ टक्के मतदार वाढले असल्याचे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.
राहुल गांधी यांनी न्यूज लाँड्रिंगच्या बातमीचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात मतदार यादीत फक्त ५ महिन्यांत ८ टक्के वाढ झाली. काही बूथवर २० ते ५० टक्के वाढ झाली. बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची माहिती दिली होती. माध्यमांनी पडताळणी केलेल्या पत्त्याशिवाय हजारो मतदारांना उघड केले. निवडणूक आयोग गप्प का?.’
In Maharashtra CM’s own constituency, the voter list grew by 8% in just 5 months.
Some booths saw a 20-50% surge.
BLOs reported unknown individuals casting votes.
Media uncovered thousands of voters with no verified address.
And the EC? Silent – or complicit.
These aren’t… pic.twitter.com/32q9dflfB9
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 24, 2025
राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले की,’हे काही वेगळे दोष नाहीत. ही मत चोरी आहे. कबुलीजबाब म्हणजे कबुलीजबाब. म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करतो.’ राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुजेट प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.
न्यूज लाँड्रिंगने दिलेल्या वृत्तानुसार, ६ महिन्यांत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात २९,२१९ मतदारांची भर पडली. मतदान कर्मचाऱ्यांचा दावा आहे की मतदारांची संख्या कमी आहे. दररोज सुमारे १६२ मतदार आहेत. ही ८.२५ टक्के वाढ आहे. जी निवडणूक आयोगाच्या स्वतःच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनिवार्य पडताळणी तपासणी सुरू करणाऱ्या ४ टक्के मर्यादेच्या दुप्पट आहे.
Discussion about this post