नवी दिल्ली । आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. तसेच महाराष्ट्रापासून कर्नाटकात मतांची चोरी कशी झाली याचे पुरावे दिलेत. त्यांनी देशातील निवडणुकांत घोटाळा होत असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाच महिन्यांत पाच वर्षांपेक्षा जास्त मतदार वाढले, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय.मतदारांच्या यादीत कशाप्रकारे गडबड केली गेली याचे पुरावे राहुल गांधींनी दिलेत.
राहुल गांधी यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा हवाला देताना त्यांनी मतदारांच्या यादीत मोठ्या प्रमाणात गडबड करण्यात आली. जेणेकरून भाजपला निवडणुकीत फायदा होईल. महिनाभर चालणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवरून संशय निर्माण होत असल्याचं राहुल गांधी म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीत आणि मतदानातील गडबडीवर बोलताना ते म्हणाले, एक्झिट पोल वेगळंच असतात. तर निवडणुकीचे निकाल वेगळेच लागतात.महाराष्ट्राच्या निवडणुकीवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रात ४० लाख मतदार आहेत, ज्याचं रहस्य अजून समजलेले नाही.
महाराष्ट्रात मतदार वाढलेत
एक काळ असा होता, जेव्हा इलेक्ट्रॉनिक मशीन्स नव्हत्या, तेव्हा संपूर्ण देश एकाच दिवशी मतदान करत होते. पण आजच्या काळात, उत्तर प्रदेशात मतदान वेगवेगळ्या वेळी होते. बिहारमध्ये ते वेगवेगळ्या वेळी होत आहे. मतदान प्रक्रिया महिनाभर चालते. यावर आम्ही चिंता व्यक्त करत आहोत. महाराष्ट्रात ५ वर्षांपेक्षा ५ महिन्यांत जास्त मतदार जोडले गेलेत. महाराष्ट्राच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार जोडले गेलेत. यामुळे अधिक संशय निर्माण होतो, असं राहुल गांधी म्हणाले.
निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करताना राहुल गांधी म्हणाले, निवडणूक आयोगाने आम्हाला मतदार यादी देण्यास नकार दिला. निवडणूक आयोग मतदार यादींना मशीन रीडेबल डेटा देत नाही जेणेकरून हे सर्व पकडले जाऊ नये. महाराष्ट्रातील निवडणुकीत संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर मतदानात मोठी वाढ झाली, असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत परंतु असं काही झालं नाहीये.
मत चोरीवर बोलताना राहुल गांधी यांनी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकींचे पुरावे दाखवले. बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले. त्यांनी असा दावा केला की , बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी ६ मतदारसंघात भाजप पिछाडीवर आहे, परंतु महादेवपुरा येथे त्यांना एकतर्फी मत मिळाले. तेथे एक लाखापेक्षा जास्त मतांची चोरी झाली. एकाच पत्त्यावर ५०-५० मतदार होते, अनेक ठिकाणी नावे सारखीच होती, पण फोटो वेगवेगळे होते. जवळपास ११,९६५ डुप्लिकेट मतदार होते. तर ४० हजार मतदारांचा पत्ता बनावट होता.
Discussion about this post