नवी दिल्ली : मोदी आडनाव प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना शिक्षा सुनावत दोन वर्षासाठी लोकसभा सदस्यता रद्द करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने राहून गांधीनां दिलासा देत याप्रकरणावर स्थगिती दिली. त्यानंतर आज राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे.
लोकसभा सचिवालायकडून राहुल गांधींना पुन्हा लोकसभा सदस्यता देण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे संसदेमध्ये पुन्हा गांधी वादळ धडकणार आहे. आज पुन्हा राहुल गांधी आणि मोदी सरकार संसदेत आमने सामने दिसणार आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. आजपासून राहुल गांधी हे लोकसभेमध्ये उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी हे आज लोकसभेत अविश्वास ठराव प्रस्तावाच्या चर्चेत सहभागी होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
Discussion about this post