पुणे : उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक पदासाठी भरती जाहीर झाली. यापदासाठी ८ नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमधील शासनमान्य प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त असलेल्या एकूण १११ प्राध्यापकांच्या भरतीकरिता भरती जाहीर करण्यात आली.
पदाचे नाव :
प्राध्यापक – 32 जागा
सहयोगी प्राध्यापक – 32 जागा
सहाय्यक प्राध्यापक – 47 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: Ph.D + 10 रिसर्च पब्लिकेशन्स + 10 वर्षे अनुभव किंवा Ph.D +10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) Ph.D (ii) 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी (iii) 07 रिसर्च पब्लिकेशन्स (iv) 08 वर्षे अनुभव
पद क्र.3: 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी+ NET/SET किंवा Ph.D
दरम्यान प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचे सविस्तर शुद्धिपत्रक विद्यापीठाच्या ‘admin.unipune.ac.in/recruitment’ या संकेतस्थळावर उद्या शुक्रवारी (ता. ७) प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी परिपत्रकाद्वारे दिली.















Discussion about this post