पुणे । पुण्यातील खराडी रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. खेवलकर रेव्ह पार्टीत साडल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. यामुळे राजकीय वातावरण तापलं असून अशातच या प्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आलीय. रेव्ह पार्टीचा तपास करणाऱ्या पोलिसांकडून मोठी चूक झाल्याची बाब उघडकीस आलीय. डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचं पोलिासांनी न्यायालयात म्हटलं होतं. मात्र त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचा दावा वकिलांनी केलाय.
दरम्यान पोलिसांनी बनाव करून डॉ. प्रांजल खेवलकर यांना अडकविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी केलाय.पोलिसांनी आधी हॉटेलची रेकी केली होती त्यानंतर प्रांजल खेवलकर यांना अडकविण्याचा कट रचण्यात आला असा आरोप खेवलकर यांच्या वकिलांनी केलाय. दोन महिला आरोपींकडे अंमली पदार्थ देऊन प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात आले. इशा सिंग हिच्या पर्समधे सिगारेटच्या रिकाम्या पाकीटात कोकेन सापडलं होतं.
इशा सिंगला प्लांट करण्यात आले होतं,असं प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी सांगितलंय. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झालाय. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांकडून मोठी चूक झाल्याचं समोर आले आहे. डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचं सांगितले होते.
मात्र त्यांच्यावर एकही गुन्ह्यांची नोंद नाही ही बाब वकिलांनी पोलीस आयुक्तांना दाखवून दिलीय. रिमांड कॉपीमध्ये आरोपी क्रमांक एकवर प्रांजल खेवलकर आणि आरोपी क्रमांक पाचवर श्रीपाद यादव यांचे नाव घेण्यात आले आहे. या दोघांवर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. मात्र आरोपी क्रमांक दोन निखिल पोपटानी आणि आरोपी क्रमांक पाच श्रीपाद यादव यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. टायपिंग करताना चूक झाल्याचं पोलिसांनी मान्य केलंय. मात्र पोलिसांच्या टायपिंगच्या चुकीमुळे आमच्या अशिलाची बदनामी झाल्याच वकिलांनी म्हटलंय.
Discussion about this post