पुणे । राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ५० जागांपर्यंतच मजल मारता आली. दुसरीकडे महायुतीने भक्कम जागा जिंकून सत्ता स्थापन केली. यामुळे मविआच्या मित्रपक्षातील अनेक नेते महायुतीच्या घटकपक्षांमध्ये प्रवेश घेताना दिसत आहे. यातच पुण्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे.
पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून ते आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस सोडताना दु:ख व्यक्त होत असल्याची भावना व्यक्ती केली.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या शिवसेनेच्या शिंदे गटात पक्षप्रवेशाबाबत चर्चांना उधाण आलं होतं. याच चर्चांना धंगेकर यांनी पूर्णविराम दिलेला आहे. मुंबईत आज धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. धंगेकर आज सायंकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत.
‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामंत यांना भेटलोय. कार्यकर्त्यांसोबत सगळ्याची चर्चा केली. आज कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेणार. कार्यकर्ते मतदारांचा आदर करूनच प्रवेश करणार आहे’, असे रवींद्र धंगेकर म्हणालेत.
Discussion about this post