पुणे महानगरपालिकेत समाज विकास विभागात भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. १२वी, डिप्लोमा आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. या भरतीची जाहिरात समाज विकास विभाग व पुणे महानगरपालिकेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. ()
पुणे महानगरपालिका आणि समाज विकास विभागाद्वारे ही भरती करण्यात येणार आहे. विविध पदे भरती केली जाणार आहे. १२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.डिजिटल फोटोग्राफी इन्स्ट्रक्टर, वायरिंग, मोटर रिवाइंडिंग, फ्रीज एसी दुरुस्ती प्रशिक्षण, मोबाईल रिपेअर इंस्ट्रक्टर, भरतकाम प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १२ वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित क्षेत्रात पदवी किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा. याचसोबत उमेदवाराला १ वर्षाचा कामाचा अनुभव असावा. त्याचसोबत टायपिंग प्रशिक्षण, इंग्रजी भाषा ट्रान्सलेशन प्रशिक्षक अशा पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
पुणे महानगरपालिकेअंतर्गत समाज विकास विभागात २९ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची भरती सहा महिन्यांकरिता करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज त्याचसोबत पासपोर्ट साइज फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता दाखला आणि इतर कागदपत्रे हे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण पुणे येथे पाठवायचा आहे. २ जानेवारी २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावेत.
Discussion about this post