नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. पुणे महानगरपालिकेत भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालवता अर्ज करावा. अर्ज करण्याचा कालावधी अत्यंत कमी आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यां लोकांसाठी खरोखरच ही एक मोठी संधी आहे.
पुणे महानगरपालिकेत एकूण ६८२ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.इच्छुक उमेदवारांकडून पुणे महानगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची मुदत अत्यल्प आहे. १९ ऑगस्टपर्यंत इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कोणत्या पदांसाठी भरती ?
पुणे महानगरपालिकेत पुढील पदांसाठी भरती सुरू आहे. कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन,वेल्डिंग, पेटिंग, या जागा भरण्यात येणार आहेत. पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालीय. पुणे महानगरपालिकेअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. नुकतंच पालिकेनं याबाबत अधिसूचना जाहीर केलीय.
६८२ पदांसाठी होणार भरती
या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत ईन पद्धतीने करायचा असून १९ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. खरं तर जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच आहे. त्यामुळे वेळ न दवडता तातडीने अर्ज करणं, फायदेशीर ठरणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही महानगर पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देवू शकता.
Discussion about this post