नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. पुणे महानगरपालिकेत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. विशेष १२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.१६ जुलै २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पुणे महानगरपालिकेत समाज विकास विभागाअंतर्गत ही भरती सुरु आहे. पुणे महानगरपालिकेद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या विभागात विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ५८ वयोगटातील असावे. फ्रीज- एसी दुरुस्ती प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, कॉम्प्युटर टायपिंग प्रक्षिशक,इंग्लिश कम्युनिकेशन प्रक्षिशक, कॉम्प्युटर हॉर्डवेअर प्रक्षिशक या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
फ्रिज दुरुस्ती प्रक्षिशक या पदासाठी उमेदवाराने या क्षेत्रात डिप्लोमा किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. कॉम्प्युटर टायपिंगसाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकणार आहे. हॉर्डवेअर प्रक्षिशकासाठी बी.ई इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी असणे गरजेचे आहे. एकूण १२ रिक्त पदांसाठी ही नोकरी जाहीर केली आहे. पुणे महानगरपालिकेत तुम्हाला नोकरी करायची सुवर्णसंधी आहे.
या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज एस.एम जोशी हॉल, ५८२ रस्ता पेठ टिळक आयुर्वेद विद्यालयाच्या बाजूला, पूणे-११ येथे अर्ज द्यायचा आहे. याबाबत अधिक माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.















Discussion about this post