पुणे । पुण्याच्या कल्याणीनगरमधील हिट अँड ड्रिंक रन प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यामध्ये मध्यप्रदेशातील दोघांना जीव गमवावा लागला. दरम्यान या घटनेनंतर नामवंत व्यावसायिकाच्या आरोपी असलेल्या मुलाला काही तासातच जामीन मंजूर झाल्याने संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. या प्रकरणात बाल न्याय मंडळाने दिलेल्या निकालावर पोलिसांनी आक्षेप नोंदवला.
आता याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायालयाच्या निकालामध्ये जी नोटीस जारी केली गेली त्या नोटीसीवर ३ जजची स्वाक्षरी अपेक्षित आहे. पण त्यावर फक्त एकाच जजची स्वाक्षरी असल्याने पोलिसांनी आक्षेप घेतला होता.पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघातामध्ये आरोपी कारचालकाला पहिल्या दिवशी अटक केली होती आणि त्यानंतर बाल न्याय मंडळामध्ये त्याला हजर करण्यात आले होते. बाल न्याय मंडळाने त्याला शिक्षा सुनावली होती ज्यामध्ये त्याला ३०० शब्दाचा निबंध लिहायला लावला होता. मात्र बाल न्याय मंडळाच्या निकालामध्ये एक ट्विस्ट समोर आला आहे. बाल न्याय मंडळाच्या निकालाला थेट पुणे पोलिसांनीच आक्षेप घेतला आहे.
बाल न्याय मंडळाच्या निकालामध्ये जी नोटीस जारी करण्यात आली होती. त्या नोटीसवर तीन जजच्या स्वाक्षरी अपेक्षित आहे. मात्र बाल न्याय मंडळाने रविवारी याप्रकरणामध्ये जो निकाल दिला त्यावर एकाच जजची स्वाक्षरी दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी हा निकाल अवैद्य ठरवून पुन्हा एकदा ही केस रीओपन केलेली आहे.
बाल न्याय मंडळामध्ये जी सुनावणी होते तेव्हा निकालावर तीन जजच्या सह्या या अनिवार्य आहे. परंतु कल्याणी नगर येथील अपघातामध्ये जी सुनावणी करण्यात आली या सुनावणीच्या नोटिसीवर फक्त एकाच जजची स्वाक्षरी दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी हा निकाल ग्राह्य धरला जाऊ नये आणि हा निकाल अवैद्य ठरवावा अशी याचिका पुणे पोलिसांनी केली होती. ती मान्य करून हा निर्णय अवैद्य ठरवण्यात आलेला आहे.
आता पुन्हा नव्याने या केसवर सुनावणी होत आहे. ज्यामध्ये पोलिसांनी 185 कलम लावलेला आहे. आता दोन्ही पक्षातील युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. साडेचार वाजेपर्यंत बाल न्याय मंडळाने ही सुनावणी राखून ठेवलेली आहे. आता काही वेळातच निकाल येईल.
Discussion about this post