पुणे । पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणावरून राज्यात मोठे रान पेटलं असून यावरून अनेक नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत सरकारला धारेवर धरले. अशातच या प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झालेत. न्यायालाही पैशासमोर झुकावं लागतंय, मोदी दोन भारत बनवतायत, अशी टीका राहुल गांधींनी केलीय. पुण्यात जो अपघात झाला आहे, यात एका अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून भरधाव वेगाने पोर्शे कार चालवत दोघांना चिरडलं. यावरूनच राहुल गांधी आता आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, ”बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, ओला, उबर यांच्याकडून चुकून अपघातात कोणाचा मृत्यू झाला, तर त्यांना 10 वर्षांची शिक्षा होते. मात्र श्रींमत घरातला 16 , 17 वर्षांचा मुलगा पोर्शे कार मद्य प्राशन करून चालवतो आणि दोन लोकांची हत्या करतो. तर त्याला सांगितलं जातं की निबंध लिहा.”
ते म्हणाले, अशीच घटना बस, ट्र्क ड्रायव्हर यांच्याकडून घडल्यास त्यांच्याकडून निबंध का लिहून घेतला जात नाही? नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आलं दोन भारत बनत आहे, एक श्रीमंतांचा आणि एक गरिबांचा. यावर त्यांनी उत्तर दिलं, काय मी सगळ्यांनाच गरीब बनवू?”
नरेंद्र मोदी दो हिंदुस्तान बना रहे हैं – जहां न्याय भी दौलत का मोहताज है। pic.twitter.com/uuJHvDdeRD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 21, 2024
राहुल गांधी म्हणाले की, ”प्रश्न हा नाही आहे, प्रश्न न्यायाचा आहे. श्रींमत असो की, गरीब.. दोघांना न्याय मिळायला हवा. न्याय सगळ्यांसाठी समान असायला हवा. म्हणून आम्ही लढत आहोत.”
दरम्यान, पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवालला याची पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात चौकशी करण्यात आलीय. विशाल अग्रवाल याला संभाजीनगरमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आहेत. विशाल अग्रवाल याला पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलंय. मेडिकल टेस्टनंतर विशाल अग्रवालला उद्या कोर्टात हजर केलं जाईल.
Discussion about this post