जळगाव । पुढील महिन्यात जळगाव जिल्ह्यात राजकिय धुमाळी असणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही पुढील सप्टेंबर महिन्यात जळगावात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींनंतर शरद पवार प्रथमच जळगावात येत आहेत. त्यांची ४ सप्टेंबरला सागर पार्क मैदानावर जाहीर सभा होणार असल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले. त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.
तर,उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १० सप्टेंबरला पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली. या संदर्भात त्यांनी नुकतीच मुंबई येथे श्री. ठाकरे यांची भेट घेतली.
त्यांच्या समवेत महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते. जळगावमध्ये ठाकरे यांचीही जाहीर सभा होणार असून, त्यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थतीचा आढावाही घेतल्याचे भंगाळे यांनी सांगितले.
Discussion about this post