धुळे । धुळ्याच्या शिरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. शहरातील मांडळ चौफुलीमध्ये काही महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. याची माहिती मिळताच शहर पोलीस आणि नगरपरिषदेनं संयुक्तपणे मोठी कारवाई केली.
शिरपूर शहरातील मांडळ चौफुली परिसरात काही महिलांकडून कथित देहविक्रीचा अवैध व्यवसाय सुरू होता. दीर्घकाळापासून हा अवैध व्यवसाय महिलांकडून सुरू होता. या बेकायदेशीर व्यवसायाबाबत वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात होते. या प्रकरणावर अखेर पोलिसांनी लक्ष घातले. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी कडक पावली उचलली आहेत.
या कारवाईदरम्यान, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बुलडोझरच्या सहाय्याने परिसरातील अतिक्रमित झोपड्या आणि शेड हटवण्याची मोहिम राबवली गेली. बराच काळ या भागात सुरू असलेल्या अवैध प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. यासंदर्भात अनेकांनी तक्रारीही नोंदवल्या होत्या. या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.















Discussion about this post