जळगांव । येथील गीत झंकार आणि मेलेडी सुपरहिट आर्केस्ट्रा यांच्या वतीने आर्केस्ट्राच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा हिंदी मराठी गीतांचा सदाबहार कार्यक्रम ‘तराने नये पुराणे’आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दिनांक २७ जुलै २०२३ रोजी गुरुवारी संध्याकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान मायादेवी नगर येथील रोटरी भवन येथे होणार आहे.
ह्या कार्यक्रमात विश्वजीत कोळी, प्रसन्न पाटील, खुशी पांडे, श्रद्धा जोशी, चंदना काळे, चांदनी प्रजापती, मुक्ता चौधरी, शितल बाविस्कर, सोमनाथ बागुल, लीना बडगुजर, आणि शुभम मनुरे आदी विद्यार्थी गाणे सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मांडवी साकळीकर करणार असून यांना नितीन पाटील, युवराज सोनवणे, सुरेश साळुंखे, जयंत महाजन, मंगेश सोनवणे, लक्ष्मण राजपूत संगीताची साथ देणार आहेत.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध उद्योजक श्री. रजनीकांत भाई कोठारी तर प्रमुख पाहुणे म्हणून मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन.भारंबे आणि अध्यक्षस्थानी गीत झंकारचे अध्यक्ष विजयकुमार कोसोदे असतील. या कार्यक्रमाला के.के.कॅन्स आणि एम.डी.एस इंडस्ट्री, निषाद इंडस्ट्री यांचे सहकार्य लाभले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून जास्तीत जास्त संगीत प्रेमींनी ह्याचा लाभ घ्यावा असे मेलेडी सुपर हिट्स आर्केस्ट्रा चे संचालक मोहन तायडे यांनी केले आहे.