जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील गणितशास्त्र विभागात राष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधून दृकश्राव्य माध्यमातून धारवाड विद्यापीठाचे प्रा. एच. एस. रामाने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
प्रा.रामाने यांनी गणिताचे जीवनातील महत्व आणि फायदे सोप्या भाषेत समजावून सांगितले.या ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. किशोर पवार यांनी केले. प्रशाळेचे संचालक प्रा.एस.आर. चौधरी यांनी सुप्रसिद्ध गणिती कै.रामानुजन यांचा जीवन परिचय करून दिला.
प्रारंभी रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी प्रशाळेतील संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. आर. एल. शिंदे, गणित विभाग प्रमुख प्रा किशोर पवार, प्रशालेतील डॉ तिडके, डॉ आगे, डॉ मनोज पाटील, डॉ रोहन कोष्टी, उन्नती सोनावणे, संशोधक विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
पाहुण्यांचा परिचय आणि सूत्रसंचालन डॉ. आगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. तिडके, उन्नती सोनावणे, संशोधक विद्यार्थी आणि विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त विभागातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या राहात असलेल्या गावातील शाळेत, महाविद्यालयात गणित विषयाचे महत्त्व आणि रामानुजन यांच्याबद्दल माहिती देवून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने गणित दिवस साजरा केला. या उपक्रमात विभागातील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
Discussion about this post