जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी मोठ्या जल्लोषात झाला.
प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून आयसर, पुणे येथील प्रा.श्रीनिवास होथा यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर उपस्थित होते. याशिवाय व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.पवित्रा पाटील,प्राध्यापक सुरेखा पालवे, स्पर्धेचे समन्वयक प्रा.एच.एल. तिडके, उपसमन्वयक डॉ. नवीन दंडी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे उपस्थित होते.
यावेळी प्राचार्याच्यावतीने प्राचार्य डी.एस.सुर्यवंशी, प्राचार्य आर.आर.अहिरे यांनी तर सहभागींच्या वतीने हर्षवर्धन वाघ, याशिका पानसर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हास्तरावरून विद्यापीठ स्तरावरील संशोधन स्पर्धेसाठी ३६२ प्रवेशिकांची निवड करण्यात आली होती. १९ डिसेंबर रोजी पहिल्या फेरीत सादरीकरण केल्यानंतर त्यातील उत्तम प्रवेशिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. शुक्रवारी विद्यापीठाच्या विविध सहा प्रशाळांमध्ये या प्रवेशिकांचे सादरीकरण झाले. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. पारितोषिक वितरण प्रसंगी बोलतांना प्रा. श्रीनिवास होथा म्हणाले की, वेगवेगळ्या कल्पना शक्तिचा विचार करुन संशोधन करणे आवश्यक आहे. संशोधनाच्या माध्यमातून समस्या शोधून त्यावर उपाययोजना करणे महत्वाचे असल्याचे प्रा. होथा यांनी सांगीतले. संशोधक विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
डॉ. भरत अमळकर म्हणाले की, संशोधन वृत्तीमुळे जीवनात निश्चितच अदभूत बदल होत असल्याने संशोधनाचा दर्जा उत्तम असावा. संशोधन करतांना ऑऊट ऑफ बॉक्स जाऊन विचार करण्याची गरज आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी गुणवत्तापूर्वक आणि उत्तम संशोधन व्हायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्रा. एस.टी. इंगळे यांनी अविष्कार स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत विजेत्या स्पर्धकांकडून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. विचारशक्ती व कल्पना शक्तीचा संशोधनात विचार केला तर नक्कीच अविष्कार होतो, असेही ते म्हणाले. प्रारंभी स्पर्धेचे समन्वयक प्रा.एच.एल. तिडके यांनी स्पर्धेचा आढावा सादर केला. सुत्रसंचालन डॉ. विजय घोरपडे यांनी केले. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी आभार मानले. प्रा. पी.पी. पुराणिक यांनी स्पर्धेचे निकाल वाचन केले.रिसर्च,शिरपुर)
पदव्युत्तर –(पीपीजी) :- पोस्टर प्रथम : सुमित सिताराम राठोड
(आर.सी.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
पोस्टर द्वितीय : गौरव श्रीराम पाटील
(एच.आर.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
कृषी व पशुसंवर्धन शाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : दिपवर्धन पी. चौधरी, तेजस एस. पाटील
(एच.आर.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
पोस्टर द्वितीय: सानिका प्रमोद माळी, वसुधा साहेबराव पाटील
(एच.आर.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
पोस्टर तृतीय : अक्षय नंदु काकडे, हर्षा दिनकर कुरकुरे
(एम.जे.कॉलेज, जळगाव स्वायत्त संस्था संलग्न कबचौउमवि,जळगाव)
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : हर्षदा राजेंद्र गव्हाले
(एच.आर.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
पोस्टर द्वितीय : लिना जी. शिंपी, दिक्षीता एम. जैन
(आर.सी.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
पोस्टर तृतीय : प्रतिक्षा शांतीलाल पाटील, निकीता भानूदास सोनवणे
(आर.सी.पटेल, आर्ट,कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज,शिरपुर)
पदव्युत्तर –(पीपीजी):- मॉडेल प्रथम : देवश्री सुनिल सोनवणे
(एम.जे.कॉलेज, जळगाव स्वायत्त संस्था संलग्न कबचौउमवि,जळगाव)
पोस्टर द्वितीय : गिरीष दशरथ चाटे
(स्कुल ऑफ कॉम्प्युटर सायन्स, कबचौउमवि,जळगाव )
शिक्षकेत्तर गट :- प्रथम : निंबाजीराव विनायकराव पाटील , (कबचौउमवि,जळगाव)
द्वितीय : संजय दयाराम बागल, सोनल सचिन सराफ,
(एच.आर.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
Discussion about this post