मध्य प्रदेशमधील राजगडमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पुलावरुन खाली पडल्याने अनेक प्रवासी जखमी झाले आहे. या घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ४० प्रवाशी जखमी झाले आहेत.पोलिस या अपघाताचा तपास करत आहे. जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील पाचोर परिसरातल सदगुरु ढाब्याजवळ हा अपघात झाला आहे. ही बस इंदोरहून गुनाच्या दिशेने जात असताना रात्री उशिरा हा अपघात झाला. जखमी प्रवाशांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे. हा अपघात खूपच भीषण होता. बस पुलावरुन पडल्यानंतर प्रवाशांनी आरडाआोरडा केला. त्यामुळे आजूबाजूच्या प्रवाशांना या घटनेची माहिती मिळाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक लोकांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेत २ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, अनेकांच्या डोक्याला मार बसला आहे. त्यातच त्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. या अपघातात बसचे खूप मुकसान झाले आहे. बसच्या काचा फुटल्या. त्यामुळे अनेक प्रवाशी जखमी झाले आहे. ही बस क्रेनच्या साहाय्याने वर काढण्यात आली आहे. पोलिस या अपघाताचा तपास करत आहे. जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Discussion about this post