मुंबई । राज्यातील महायुती सरकारमधील राष्ट्रावादी काँग्रेसचे मंत्री अडचणीत सापडले आहे. सरपंच हत्या प्रकरणात अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे देखील एका जुन्या वादामुळे अडचणीत आलेत. दोन्ही मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक महत्वाचे आदेश दिले आहे.
महायुतीच्या सरकारचे प्रशासन स्वच्छ असावे. राज्य करताना कोणाचीही पर्वा करू नका, असे आदेश पंतप्रधान मोदींनी फडणवीस यांना दिलेत. पंतप्रधान मोदींच्या या आदेशामुळे आरोप होणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.
दिल्लीतील शपथविधी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली याचा तपशील समोर आलाय. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वच्छ प्रशासन करा असे आदेश दिलेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राजीनामे घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तळात होत आहे. राज्यातील प्रशासन स्वच्छ असावे, त्यात कुणाचीही पर्वा करू नका, असे आदेश देणार पत्र पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी रेखा गुप्ता विराजमान झाल्या आहेत. रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्याला एनडीए सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी फडणवीस यांना स्वच्छ प्रशासन करावे असे सांगितले आहे.
Discussion about this post