इंदापूर । इंदापूरच्या राधिका पॅलेसमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वकील आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. या सभेमध्ये अजित पवार यांनी ‘तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा.’, असं वक्तव्य केलं असून त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं काय म्हणाले अजितदादा?
अजित पवार म्हणाले की, ‘काय लागेल तो निधी आम्ही द्यायला सहकार्य करू. पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी देतोय तशी आमच्यासाठी मशीमध्ये कचाकचा बटणं दाबा. म्हणजे आम्हाला निधी द्यायला बरं वाटेल. नाही तर माझा हात आखडता येईल.’ अजित पवाराच्या या वक्तव्यामुळे आता सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली आहे.
अजित पवार यांनी पुढे सांगितले की, ‘मला आदेश द्यायची सवय झाली आहे. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना आदेश देत असतो. पण कार्यकर्त्यांना आदेश द्यायचा नसतो. कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरी बसवतील. कार्यकर्त्यांना नीट बोलावं लागतं.’, अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर या सभेमध्ये उपस्थित असणारे सर्वजण हसू लागले.
अजित पवार यांनी असे देखील सांगितले की, ‘जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी कामे केली आणि करतो आहे. पदावर काम करण्याची संधी मिळाली तर पुढच्या 25/50 वर्षांचा विचार करा. बारामतीत कामाला आदर देतात. पण भरत शहा यांनी टनदिशी उडी मारली. एवढं करून ते गेले असे काय घडले? आताच निवडणूक वेळी जायचं होतं का? मी काल त्याच्याशी बोललो होतो.’















Discussion about this post