नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विरोधकांनी ऐकी दाखवत ‘इंडिया आघाडी’च्या छताखाली एकत्र आले आहेत.
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी बैठकांचा धडाका लावला असून काल मंगळवारी इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचीही चर्चा झाल्याची माहिती हाती आली आहे.
वंचित बहुजन आघाडीला ‘इंडिया आघाडी’त सोबत घेण्याबाबत नेते अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.वंचित बहुजन आघाडीकडे त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाने प्रस्ताव मागवल्याचे बैठकीतून समोर आले आहे.
वंचित आघाडीचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांना आघाडीत घेण्याबाबत चर्चा होणार आहे. याच महिन्यात वंचित आघाडी त्यांचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती हाती आली आहे. मतांचं विभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची इंडिया आघाडीची भूमिका आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.















Discussion about this post