मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं असून आता उद्या २३ नोव्हेंबरला निकाल लागणार हाये. आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार राज्यात अटीतटीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी किंवा महायुतीला बहुतम न मिळाल्यास राज्यात अपक्ष आणि लहान पक्षांचा बोलबोला असणार आहे.
त्यामुळे आता मुंबईमध्ये हालचाली वाढल्या असून, सर्वच पक्षांकडून आपल्या आमदारांना संपर्क करण्यास सुरूवात झाल्याचं कळतंय. काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही मुंबईत पार पडली, तर दुसरीकडे महायुतीही तयार असल्याचं दिसतंय. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राज्यात एखाद्या पक्षाला पाठिंबा देण्याची वेळ आल्यास आपण कुणाच्या बाजूने असणार हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
If VBA gets the numbers, tomorrow, to support a party or an alliance to form the government in Maharashtra, we will choose to be with one who can form the government.
We will choose power! हम सत्ता में रहना चुनेंगे!
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) November 22, 2024
जर उद्या वंचित बहुजन आघाडीला ठराविक जागा मिळाल्या आणि सरकार स्थापन करण्यासाठी कुणाला पाठिंबा देण्याची वेळ आली, तर वंचित कुणाच्या बाजूने राहील असा प्रश्न सध्या वंचितच्या समर्थकांनाही पडला असेल. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी आता हे स्पष्ट केलं असून, अशा परिस्थितीत आपण जो कुणी सत्ता स्थापन करु शकेल, त्यांच्या बाजूने राहणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी आपले दार सर्वांसाठीच खुले केल्याचं दिसतं आहे.
Discussion about this post