मुंबई । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी शरद पवार हे पूर्णपणे भाजपचे हस्तक असल्याचा दावा केला आहे. आंबेडकर यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
पंढरपूर न्यायालयात आज कोरोना काळातील एका प्रकरणी हजर राहण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यावर देखील आरोप करत दिल्लीत महाविकास आघाडीची बैठक झाली असली तरी शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत. भाजपला सोडून ते कधीही बाहेर पडू शकत नसल्याचे ते म्हणाले.
सध्या व्हीव्हीपीटी वरून राज्यात पॉलिटिकल पॅरालिसिस झाला आहे. त्यामुळे vvpt शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असतील; तर बॅलेटवर निवडणुका घ्या. अशी थेट मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष आणि चिन्ह कायम राहील. कारण आयोगाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या वतीने आहे. त्यामुळे आता कोर्ट वेगळा निर्णय घेईल. असे वाटत नाहीत.
मोदींनी मित्र देश गमावले
नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय दौऱ्यात भारतीयांना एकत्र करण्याच्या प्रयत्नात मित्र देश गमावले आहेत. यातूनच अमेरिकेने भारतावर ७० टक्के टॅरीफ लावण्यात आले आहे. अमेरिकेशी १९० बिलियन डॉलर इतका व्यवहार आहे. यामध्ये ६० बिलियन डॉलरचा व्यवहार टेक्सटाइल आहे. यातच आता टॅरीफ लागल्याने सोलापुरी चादर आणि टॉवेल आता विकल्या जाणार नाहीत. बेरोजगारी वाढेल. अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
Discussion about this post