भुसावळ : रावेर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारासाठी आज शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भुसावळ येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आंबेडकरी समाजासह अल्पसंख्यांक, आदिवासी आणि वंचित समुदाय मोठ्या प्रमाणात असल्याने ब्राह्मणे यांच्या सारख्या भक्कम उमेदवाराला रिंगणात उतरवल्याने रावेरचा लढा रंगतदार होण्याची शक्यता आहे. मतदारसंघात त्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. यातच आता आज दिनांक ३ मे रोजी भुसावळात बाळासाहेब आंबेडकर यांच्या भव्य सभेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर करण्यात आले आहे.
भुसावळ हे आंबेडकरी चळवळीचे मोठे केंद्र असून येथे दलीत मतदार बहुसंख्येने आहेत. या अनुषंगाने भुसावळची सभेसाठी निवड करण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून याला मतदारसंघातून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याचे नियोजन उमेदवार संजय ब्राह्मणे, जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, युवक जिल्हाध्यक्ष बाळा पवार, महिला जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे आणि त्यांच्या सहकार्यांनी केले आहे















Discussion about this post