मुंबई : केंद्र सरकारने भारतात जात जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून सरकारच्या या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत केलं आहे.मात्र दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सरकारने ही घोषणा केल्याची टीकाही केली जात आहे. अशातच आता या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे सरकारला सवाल केला आहे.
ही जनगणना सरकार कशी करणार? असा सवाल त्यांनी केला आहे. कारण ही जात जनगणना करणं अशक्य असल्याचं सरकारनेच सुप्रीम कोर्टात दिलेल्या शपथपत्र नमुद केल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सरकारची भूमिका ही दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत जातनिहाय जनगणनेवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
केंद्र सरकार ने जातीय जनगणना कराने का निर्णय लिया है। ऐसी घोषणा जरूर की गई है, लेकिन यह एक दिखावा है और जनता की आंखों में धूल झोंकने का प्रयास है।
"सरकार ने अब तक यह नहीं बताया है कि जनगणना कब कराई जाएगी। उल्टा, सुप्रीम कोर्ट में दाखिल प्रतिज्ञापत्र में केंद्र सरकारने कहा है कि… pic.twitter.com/rETWybkgH9
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) April 30, 2025
तर जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला नाही ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, “केंद्र सरकारने जात जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. पण हा एक दिखावा असून जनतेच्या डोळ्यात धुळफेक कऱण्याचा प्रयत्न आहे.
कारण सरकारने अद्याप जनगणना कधी करणार हे सांगितलेलं नाही. उलट, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने जातीय जनगणना करणे शक्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारची ही भूमिका दुटप्पी आणि संभ्रम निर्माण करणारी वाटते. शिवाय केंद्र सरकार जाणूनबुजून जनगणना पुढे ढकलत आहे.
जर जनगणनाच झाली नाही तर जातींची जनगणना कशी शक्य आहे? सरकारने याचं उत्तर द्यावं.” तसेच, जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटनेमुळे देशभर संताप व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला नाही ना? असं म्हणत सरकारच्या निर्णयावर त्यांनी शंका उपस्थित केली.
Discussion about this post