मुंबई । देशात लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी संविधान, घटना बदलण्याच्या मुद्या उचलून धरला होता. याचा फटका नरेंद्र मोदी सरकारला या निवडणुकीत बसला. तर इंडिया आघाडीने हा मुद्दा इनकॅश करत मोठी मजल मारली. दरम्यान, संविधानाच्या मुद्यांवरुन प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोन्ही नेत्यांना आता फैलावर घेतले आहे.
संविधानावर खरचं प्रेम असेल, तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी मनुस्मृती जाळा, असे आव्हान वंचित बहुजन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान आणि देशाच्या विरोधी पक्षनेत्याला केले आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे संविधानावर खरोखरच प्रेम असेल तर मी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना मनुस्मृतीच्या प्रती त्यांनी जाळाव्यात असे आव्हान त्यांनी केले. याविषयीचे ट्विट त्यांनी केले आहे.
दोघांचे संविधानावर हल्ले
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी संविधानावर वार केले आहेत. तसेच, वेळोवेळी उपेक्षित, वंचित जाती आणि समाजाचे शोषण केले आहे.बाबासाहेबांचे आदर्श आणि संविधानातील मूल्यांना काँग्रेस आणि भाजपने भ्रष्ट केले असल्याचेही ॲड.आंबेडकर म्हणाले.
Discussion about this post