अकोला । मराठा समाजाला आरक्षण सरकारने आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याची घोषणा केली. त्यानुसार, २० जानेवारीपर्यंत मुंबईला पोहोचण्याची मराठा आंदोलकांकडून तयारी सुरू आहे. अशातच वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा बांधवांना महत्वाचा सल्ला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे गरीब मराठा समाजाने पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मराठा समाजासाठी जरांगेंसारखं गरीब मराठ्यांचं नेतृत्व उभे राहलं ही गर्वाची गोष्ट आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळे श्रीमंत मराठा समाज हादरला आहे. त्यामुळे त्यांचं मुंबईतील आंदोलन दडपण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणला जात आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचे सरकारचे आकडे फसवे असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.राज्यातील गरीब मराठा समाजातील लोकांनी जरांगे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. मुंबईतील आंदोलनात गरीब मराठ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, असा सल्लाही आंबेडकर यांनी मराठा बांधवांना दिला. आगामी निवडणुकीमुळे सरकारचा हात दगडाखाली असल्याचं जरांगेंनी लक्षात घ्यावं, असंही आंबेडकर म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कुणालाही पाठिंबा देण्याची भूमिका घेऊ नये, त्यांनी फक्त आपल्या समाजाचीच भूमिका जाहीर करावी, असंही आंबेडकर म्हणाले. सरकारकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसींना उचकवण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.
Discussion about this post