वाशिम | राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. मात्र यांच्यात जागा वाटपा वरून अद्याप एकमत होताना दिसत नाही. दरम्यान महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण धाडण्यात आले. पण त्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे.
“आपल्याला काँग्रेस ने हे दिलं ते दिलं म्हणून मुस्लिम मतदारांनी आता काँग्रेस सोबत जाऊ नये.आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त होईल.
जर येत्या 15 दिवसात यांनी जागा वाटपाचा निर्णय घेतला तर हे वाचतील. नाही तर यांचे ही हाल इंडिया आघाडीसारखे होतील असे वक्तव्य आंबेडकर यांनी केलं. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इंडीया आघाडी तयार झाली होती. मात्र ती जेव्हा बनली तेव्हाच हे निश्चित होतं की ही तुटणार आहे, कारण याचा रिंग मास्टर पंतप्रधान नरेंद मोदी होते, असा आरोप आंबेडकर यांनी केला.
महाविकास आघाडीत समावेश होण्यासाठी वंचितचे प्रयत्न आता फळाले आहे. उद्धव ठाकरे गटासोबत त्यांचा सलोखा अगोदरच झाला. आज 30 जानेवारी रोजी महाविकास आघाडीची बैठक होत आहे. काँग्रेसने वंचितला या बैठकीसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे त्यापूर्वीच आंबेडकर यांच्या बॉम्बने खळबळ उडाली आहे. हा दबावतंत्राचा भाग तर नाही ना, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
Discussion about this post